top of page
Search

श्री गजानन महाराज प्रगट दिन व दासनवमी उत्सव

श्री कपिकुल आश्रमाच्या पिठाधिश्वरी आदरणीय १००८ श्री महंत तपोमूर्ती सद्गुरू श्रीवेणाभारती महाराज व उत्तराधिकारी व कार्याध्यक्षा कृष्णमै यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तम नियोजनांतर्गत यंदाचे वर्षीचा सेवेचा २१ वा प्रगटदिन उत्सव नाशिक येथे छान साजरा करण्यात आला. कोविड काळजी घेत प्रसाद वाटप करण्यात आले...

दि. ५ मार्च रोजी श्री गजानन महाराज प्रगटदिनानिमित्ये श्री महाराजांना, कृष्ण रुक्मिणी, गरुड हनुमान या स्वरूपाना सुंदर नवी वेशभूषा, नवी आभूषणे कृष्णमैंद्वारे अर्पिण्यात आली. मंदिरात सुंदर सजावट करण्यात आली होती , मानसपूजा व गुरू पाद्यपूजा करण्यात आली, या नंतर सर्वात महत्वाचे म्हणजे कृष्णमयी पार्थ व गौतम यांनी स्वतः Inhouse design केलेल्या श्रीकपिकुल च्या https://www.kapikul.com या वेबसाईटचे उदघाटन श्रीसद्गुरू वेणाभारती महाराज व विठूमाऊली फेम अभिनेता, अजिंक्य राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. रामकार्य कसे महाविद्युलतेपरी गुरुदेव कृष्णमयी गेली अनेक वर्षे करत आहेत ते याद्वारे आता साऱ्या जगाला समजणार आहे,😊😊🙏


दुपारच्या वेळेत श्रीमहाराजांना प्रिय अशी श्रीराम व श्री विठ्ठल भजने एका भजनी मंडळातर्फे उत्साहात सादर केली गेली. संध्याकाळी युट्यूब वरील कपिकुल चॅनेल च्या संन्यासी टॉक्स या शो चे थेट प्रक्षेपण भक्तांना अनुभवता आले... गुरुदेवांच्या सोबत अध्यात्मिक प्रश्नोत्तरांचा Live show करण्यात आला...

प्रेमाची परिभाषा काय? या विषयावरचे चर्चासत्र फारच रंगले होते. उत्तराधिकारी कृष्णमै,अभिनेता अजिंक्य राऊत यांच्याद्वारे विचारलेल्या विविध ज्ञानपूर्ण प्रश्नांना सद्गुरू वेणाभारती महाराजांनी अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन केले.. रात्री उत्सवाचा आनंद जल्लोष अनेक नृत्य, झेंडा नाचवून करण्यात आला..


तसेच दि. ७ मार्च रोजी दासनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला,या दिवशीचे विशेष महत्व म्हणजे संन्यासिनी श्री सद्गुरू वेणाभारती महाराज यांच्या संन्यस्त झोळीतील भिक्षेचा लाभ या दिवशी भक्तांना होत असतो, दरवर्षी शेकडो टन धान्याचे वाटप सद्गुरुंच्या हस्ते हजारो भक्तांना केले जाते, सद्गुरू अखंड सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत हा भिक्षालाभ स्वहस्ते भाविकांना देत असतात. हे भिक्षेचे धान्य भाविकांनी संपूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये आरोग्य, ऐश्वर्य यासाठी जतन करायचे व नैवेद्यासाठी वापरायचे असते, सकाळी दासबोधातील दास्यभक्ती या विषयावर श्री कृष्णमयी यांनी सुंदर प्रबोधन केले, तसेच गुरुदेवांनी सर्व भक्तांकडून नवे समुद्र मंथन प्रत्यक्ष करून घेतले, नवी रत्ने जशी तुळस, गज, मोती, प्राजक्त, नवविधा भक्ती पायऱ्या, ज्ञान, ग्रंथ, श्रीना व कृष्णमयी याना भेट केली, हा नयनरम्य सोहळा यादिनी कपिकुल येथे झाला, सौमित्र दादा ने स्वतः पराग व इतर सेवेकरी मिळुन हलता मेरू पर्वत तयार केला होता, कूर्म, मंथन दोरी, समुद्राचा आवाज सारे काही साक्षात सुंदर उभे केले होते, हृदय भरून आले होते, सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला, गुरुदेवच सर्वांच्या आनंदासाठी इतके झटत असतात, धन्य धन्य, याही दिवशी गुरुदेवांच्या सोबत आध्यात्मिक live show करण्यात आला..या उत्सवाची काही क्षणचित्रे ।


 
 
 

Comments


bottom of page